
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. २६) मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी कारगिल दिनाचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानने स्वतःच्या देशातील अंतर्गत कलहांवरून लक्ष हटवण्यासाठी भारतावर हा हल्ला करण्याचे धाडस केले होते, असे सांगितले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. २६) मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी कारगिल दिनाचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानने स्वतःच्या देशातील अंतर्गत कलहांवरून लक्ष हटवण्यासाठी भारतावर हा हल्ला करण्याचे धाडस केले होते, असे सांगितले.
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मोदी म्हणाले, भारत त्यावेळी पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून प्रयत्न करत होता. पण, म्हणतात ना दुष्टाचा स्वभावचं असतो की, प्रत्येकाशी कोणतंही कारण नसताना शत्रुत्व करणं, अशा स्वभावाचे लोकं जे चांगलं करतात, त्यांच्याही नुकसानीचा विचार करतात. त्यामुळेच भारताकडून मैत्रीचे प्रयत्न होत असताना पाकिस्तानकडून पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारताच्या पराक्रमी सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली. हे सगळं संपूर्ण जगानं बघितलं. तुम्ही कल्पना करू शकता, उंच पहाडांवर असलेला शत्रू आणि खालून लढणारं भारताचं लष्कर. पण विजय पहाडांचा नाही झाला, तर भारताच्या खऱ्या शौर्याची झाला, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी कारगिल विजय दिनाचं स्मरण केलं. आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा असून, २१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नाही, असं सांगत मोदी यांनी शहिदांच्या शौर्याला अभिवादन केलं. मोदी म्हणाले, २१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.