Supreme Court : दिल्लीत तूर्तास ‘पीएम-एबीएचआयएम’ योजना नाही
PM-ABHIM Scheme : : दिल्लीमध्ये आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा योजना (पीएम-एबीएचआयएम) लागू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. यामुळे सद्यस्थितीला ही योजना लागू होणार नाही.
नवी दिल्ली : दिल्लीत आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा योजना (पीएम-एबीएचआयएम) लागू करण्याचे निर्देश काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.