रोजीरोटीचे भान ठेवा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा राज्यांना सल्ला | PM Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Corona Review Meeting

१०० टक्के लसीकरणासाठी घराघरांत लस पोहोचवा, असे आवाहन पंतप्रधानांनी राज्यांना केले.

रोजीरोटीचे भान ठेवा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा राज्यांना सल्ला

नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट(third wave of corona ) धडकल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi )यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन, कोरोनाच्या या नव्या अवताराच्या मुकाबल्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित तयारीचा आढावा घेतला. कोरोनाला रोखताना अर्थव्यवस्थेचा(economy) आणि सर्वसामान्यांचाही विचार करा, तसेच १०० टक्के लसीकरणासाठी घराघरांत लस पोहोचवा, असे आवाहन पंतप्रधानांनी राज्यांना केले.

हेही वाचा: औरंगाबाद बाजार समितीतील व्यवहार महाराष्ट्र बंदच्या दिवशी सुरु;पाहा व्हिडिओ

मुख्यमंत्र्यांसमवेत आभासी स्वरूपात झालेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शहा(central home minister amit shah) हेही उपस्थित होते. लसीकरण(vaccination), आरोग्य सुविधा आणि संसर्गवाढ नियंत्रणासाठी संभाव्य निर्बंधांवर या बैठकीत चर्चा झाली. ‘‘सणासुदीच्या काळात लोकांनी आणि प्रशासनानेदेखील जागरूक राहावे. सध्या ‘ओमिक्रॉन’शी लढा देतानाच भविष्यातदेखील या विषाणूच्या कोणत्याही प्रकारासाठी तयारीत राहण्याची गरज आहे,’’ असा इशारा पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला, तसेच कोरोनाविरोधातीलरणनीती तयार करताना निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊ नये याचाही विचार राज्यांनी करावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

हेही वाचा: चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

पंतप्रधान मोदी (pm modi )म्हणाले, ‘‘सर्व १३० कोटी भारतीय आपल्या अथक प्रयत्नांनी नक्कीच कोरोनाला पराभूत करतील. ओमिक्रॉनबद्दलचे(omicron varient) प्रारंभिक चित्र हळू हळू स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या आधीच्या प्रकारांपेक्षा ‘ओमिक्रॉन’ अनेक पटींनी अधिक वेगाने संसर्गाचा फैलाव करत आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन उपाययोजना करत आहेत.’’ ‘ओमिक्रॉन’च्या संसर्गाचा वेग प्रचंड असल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.लसीकरणाचा संदर्भ देत पंतप्रधाानांनी सांगितले, ‘‘कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस सुमारे ९२ टक्के प्रौढ लोकांना दिला असून ७० टक्के नागरिकांना दुसराडोसही मिळाला आहे. (vaccination )किशोरवयीनांच्या लसीकरण मोहिमेला हिरवा कंदील दाखविल्यानंतरच्या अवघ्या दहा दिवसांमध्ये भारताने सुमारे तीन कोटी मुलांचे लसीकरण पूर्ण केले आहे.’’

राज्यात चोवीस तासांत ४६ हजार नवीन रुग्ण

राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव सुरूच असून, गेल्या चोवीस तासांत एकूण ४६,४०६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात मुंबईत १३,७०२, पुण्यात ७,४३० आणि पिंपरी-चिंचवड येथील २,२१२ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत ‘ओमिक्रॉन’चा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, राज्यातील पॉझिटिव्हिटीचा (maharshtra corona update)दरही वाढला आहे. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर ११ जानेवारीपर्यंत सरासरी २१.३९ वर पोहोचला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top