esakal | Proud of You Indian Army : भारताच्या सैनिकांनी PM CARES ला दिले 203.67 कोटी रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

pm cares fund indian army contrubute one day salary

भारतात कोरोनाच्या या संकटाशी लढण्यासाठी पीएम केअर्स फंड सुरु करण्यात आला होता. या फंडात शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह अनेकांनी पैसे दिले होते.

Proud of You Indian Army : भारताच्या सैनिकांनी PM CARES ला दिले 203.67 कोटी रुपये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाला जगातील अनेक देश तोंड देत आहेत. गेल्या वर्षभरापासून जगात कोरोनाने थैमान घातलं असून याचा देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. याशिवाय जिवित हानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. दरम्यान, भारतात कोरोनाच्या या संकटाशी लढण्यासाठी पीएम केअर्स फंड सुरु करण्यात आला होता. या फंडात शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह अनेकांनी पैसे दिले होते.

भारताच्या सैनिकांनीही त्यांचे एक दिवसाचे वेतन फंडासाठी दिले. हवाई दल, नौदल आणि लष्कराच्या जवानांनी या फंडात जवळपास 203.67 कोटी रुपयांचे योगदान दिल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल  ते ऑक्टोबर दरम्यान एअर फोर्सकडून पीएम केअर्स फंडात 29.18 कोटी रुपये देण्यात आले. एप्रिलमध्ये 25.03 कोटी, मे महिन्यात 72.24 लाख, जूनमध्ये 1.08 कोटी, जुलैमध्ये 73.93 लाख, ऑगस्टमध्ये 61.18 लाख, सप्टेंबरमध्ये 50.27 लाख, ऑक्टोबरमध्ये 46.7 लाख रुपये दिले गेले. तर नौदलाकडून एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 12.41 कोटी रुपये या फंडासाठी देण्यात आले. 

हे वाचा - अवकाश भरारीची यशाने सांगता;‘इस्रो’च्या ‘सीएमएस-०१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

लष्कराकडून 15 मे रोजी ट्विट करण्यात आलं होतं की, लष्कराने त्यांचे एक दिवसाचे वेतन पीएम केअर्स फंडासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात एक दिवसाचे वेतन म्हणून लष्कराकडून 157.71 कोटी रुपये देण्यात आले होते. यावर्षी 29 मार्चला संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, कोरोनाशी लढण्यासाठी सैनिक त्यांचे एक दिवसाचे वेतन पीएम केअर्स फंडात देणार आहेत. यासोबत असंही सांगितलं होतं की, कर्मचाऱ्यांचे योगदान हे स्वेच्छेने असणार आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याआधी माहितीच्या अधिकारांतर्गत असं समोर आलं होतं की, पीएम केअर्स फंडात सात सार्वजनिक बँका आणि रिझर्व्ह बँकेसह इतर आर्थिक संस्थानांकडून 204.75 कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले. याशिवाय अनेक केंद्रीय शैक्षणिक संस्थांकडून 21.81 कोटी रुपये पीएम केअर्स फंडासाठी मिळाले आहेत. तर 98 जणांनी सीएसडीआय फंडातून जवळपास 2 हजार 422 कोटी रुपयांहून अधिक योगदान दिलं. 

loading image