esakal | Coronavirus : मोदींनी हेडलाईन दिली पण...: माजी अर्थमंत्र्यांची टीका 

बोलून बातमी शोधा

PM Gave Us Headline And Blank Page : P Chidambaram On Economic Package

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे.

Coronavirus : मोदींनी हेडलाईन दिली पण...: माजी अर्थमंत्र्यांची टीका 
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. मोदींनी हेडलाईन दिली पण, बाकी पान मात्र रिकामे सोडले असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फक्त हेडलाइन असून कोरं पान आहे, अशी टीका केली आहे. काल (ता. १२) पंतप्रधानांनी हेडलाइन आणि कोरं पान दिलं आहे. अर्थमंत्री ते कोरं पान कसं भरतात ते आज आम्ही पाहू. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून जे पैसे ओतले जाणार आहेत, त्यातल्या प्रत्येक अतिरिक्त रुपयावर आमचे बारीक लक्ष असेल. कोणाला काय मिळणार त्याचा सुद्धा आम्ही बारकाईने अभ्यास करु, असे चिदंबरम यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

वेगवेळया राज्यातून घराकडे निघालेल्या हजारो स्थलांतरित मजुरांबद्दल चिदंबरम म्हणाले की, गरीब आणि उद्धवस्त मजुरांनी शेकडो किलोमीटरची पायपीट केली, त्यांना या पॅकेजमधून काय मिळते त्यावरही आमचे लक्ष असेल. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज या पॅकेजबद्दल विस्तृत माहिती देणार आहेत. त्यामुळे पॅकेजमधून कुठल्या क्षेत्राला किती लाभ होईल ते स्पष्ट होईल.