esakal | ऑक्सिजनची चिंता मिटणार, PM मोदींनी घेतला मोठा निर्णय

बोलून बातमी शोधा

narendra modi

ऑक्सिजनची चिंता मिटणार, PM मोदींनी घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. ऑक्सिजन आणि बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. ऑक्सिजन अभावी लोकांना प्राण गमावावा लागत आहे. या अडचणीच्या प्रसंगी पीएम मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM केअर फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरला मंजूरी दिली आहे. बुधवारी झालेल्या उच्चस्थरिय बैठकीत नरेंद्र मोदी यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

देशातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर बुधवारी नरेंद्र मोदी यांनी उच्चस्थरिय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पंतप्रधानांन मोदी यांनी देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजन संकटावर चर्चा केली. कोरोना काळात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचं व्यवस्थापन कसं करायला हवं, यावर चर्चा झाली. पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरच लवकरात लवकर खरेदी करुन गरज असलेल्या राज्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्या.

हेही वाचा: हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये नेमका फरक काय?

यापूर्वी पीएम केअर फंडातून 713 पीएसए प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आता मोदी यांनी पीएम केअर फंडाअंतर्गत 500 नवीन ऑक्सिजन प्लांटलाही मंजूरी दिली आहे. 500 नवीन पीएसएला मंजूरी दिली आहे. यांवा डीआरडिओ आणि CSIR मार्फत स्वदेशी तंत्रानाद्वारे विकसीत केलं जाणार आहे.