

PM Kisan 22nd Installment
Esakal
PM Kisan Installment Update: भारत सरकारने १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, देशातील अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना बळकट आणि सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. शेतकरी आता नवीन वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो सरकार लवकरच त्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे.