How to check PM Kisan installment status
esakal
PM Kisan 24th installment date 2026 : देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. आता पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.