

pm kisan samman nidhi
esakal
New Delhi: आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि दुष्काळी स्थितीचा सामना करत असलेला बळिराजा सध्या अडचणीत आलेला आहे. या पार्श्वभूमीवर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्याची देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जातात. सध्यातरी हा हप्ता ऑक्टोबरच्या अखोरीस किंवा नोव्हेंबर २०२६ मध्ये, दिवाळीपूर्वी जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.