const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Muslims In India: "देश इतका पुढे जात आहे आणि जर तुम्हाला तुमचा समाजाबाबत काही कमतरता वाटत असतील तर विचार करा यामागे काय कारणे आहेत."
PM Modi's Advice To Muslims
PM Modi's Advice To MuslimsEsakal

सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात प्रचार दौरे तसेत विविध कार्यक्रम करत आहेत. याचबरोबर पंतप्रधान मोदींनी अनेक वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांना मुलाखली दिल्या आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेली अशीच एक मुलाखत व्हायरल होता आहे. ज्यामध्ये त्यांनी देशातील मुस्लिम धर्मियांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. सार्वजिनिक व्यासपीठावरुन पंतप्रधांनांनी पहिल्यांदाच असे वक्तव्य केल्याने याची देशभरात चर्चा होत आहे.

"मी पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला आणि त्यांच्यातील सुशिक्षित लोकांना सांगत आहे की, तुम्ही आत्मचिंतन करा. देश इतका पुढे जात आहे आणि जर तुम्हाला तुमचा समाजाबाबत काही कमतरता वाटत असतील तर विचार करा यामागे काय कारणे आहेत," असे पंतप्रधान टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

"काँग्रेसच्या काळात सरकारी योजनांचा तुम्हाला का फायदा मिळाला नाही? तुम्ही काँग्रेसच्या कालखंडात तुम्ही या दुर्दशेचे शिकार झाला आहात का? याचा विचार करा," असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले.

"तुम्ही असे मानता की, एखाद्याला सत्तेत तुम्ही बसवाल की सत्तेवरुन खाली खेचाल यातून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य खराब करत आहात. जगभरातील मुस्लिम समाज बदलत चालला आहे. आजी गल्फ देशांत जातो तेव्हा तिथे मला तर सन्मान मिळतोच पण त्याबरोबर भारतालाही सन्मान मिळतोय," अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

PM Modi's Advice To Muslims
Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

दरम्यान देशात लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. यातील पहिल्या दोन टप्प्यांचे मतदान पार पडले असून, आज तिसऱ्या टप्प्यातील जागांवर देशभरात मतदान होत आहे.

या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्ट्रीक साधण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनीही एकत्र येत पंतप्रधान मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जोर लावला आहे. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे 4 जून रोजी निकालाच्या दिवशी कळेल. याकडे सर्व देश डोळे लावून बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com