
Prakash Mahajan announces resignation from Maharashtra Navnirman Sena as spokesperson and member.
esakal
PM Modi AI Video Sparks Political Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचा एआय व्हिडिओ तयार करणे आणि सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल काँग्रेस नेत्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली भाजपच्या निवडणूक सेलचे संयोजक संकेत गुप्ता यांच्या तक्रारीवरून नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात आयटी कायद्याच्या विविध कलमानुसार आणि डिजिटल डेटा संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार १० सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून १२ मिनटांनी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक्स हँडलवर एआयने तयार केलेला बनावट व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. याप्रकरणी आता काँग्रेस आणि बिहार काँग्रेस आयटी सेलशी संबंधित नेत्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. भाजपचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ केवळ पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला डागळण्यासाठी करण्यासाठी बनवण्यात आला नाही तर महिलांच्या प्रतिष्ठेचा आणि मातृत्वाचाही अपमान आहे.
एवढच नाहीतर तक्रारीत असेही म्हटले आहे की २७-२८ ऑगस्ट रोजी बिहारच्या दरभंगा येथे आयोजित काँग्रेस-राजद मतदार हक्क यात्रेदरम्यान देखील पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविरुद्ध अनुचित टिप्पणी करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.