PM मोदींची गुजरातमधील वादळग्रस्त भागांसाठी हजार कोटीची मदत

PM मोदींची गुजरातमधील वादळग्रस्त भागांसाठी हजार कोटीची मदत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनगरला पोहोचले होते. पंतप्रधान मोदींनी आज गुजरात आणि दीव भागातील चक्रवादळामुळे झालेल्या नुकसाणीचा हवाई पद्धतीने आढावा घेतला. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागाचे त्यांनी हवाई पद्धतीने सर्वेक्षण केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये एक बैठक देखील घेतली आहे, (Narendra Modi holds a review meeting in Ahmedabad) ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांशिवाय उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहिले होते. (PM conducted an aerial survey of cyclone-affected areas of Gujarat & Diu, earlier today) या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नुकसानग्रस्त भागासाठी तब्बल 1 हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. या मदतीशिवाय देशभरात तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमी झालेल्या पीडितांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच गुजरात राज्यातील नुकसानग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक देखील पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (PM Modi announces financial assistance of Rs 1000 crore for immediate relief activities in Gujarat)

PM मोदींची गुजरातमधील वादळग्रस्त भागांसाठी हजार कोटीची मदत
गुजरातला 'तौक्ते'च्या नुकसानीची PM मोदींकडून हवाई पाहणी
PM मोदींची गुजरातमधील वादळग्रस्त भागांसाठी हजार कोटीची मदत
कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्यांची काळजी घेणार योगी सरकार

गुजरातमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्र किनारच्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वीजेचे खांब तसेच झाडे उखडली गेली आहेत. अनेक घरे तसेच रस्त्यांचं देखील नुकसान झालं असून यामध्ये जवळपास 13 लोकांचा मृत्यू झाला आहे.

या चक्रीवादळामुळे 200 हून अधिक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारने आधीच दोन लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं. रुपाणी यांनी मंगळवारी म्हटलं होतं की, 16 हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे, 40 हजारहून अधिक झाडे आमि 70 हजारहून अधिक वीजेचे खांब उखडले गेले आहेत तर 5951 गावांमधील वीज गेली आहे. गुजरातमध्ये आलेले हे आतापर्यंतचे सर्वांत भयावह चक्रीवादळ ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com