पंतप्रधान मोदींनी केलं भारताच्या निवडणूक आयोगाचं कौतुक

PM Narendra Modi
PM Narendra Modi sakal
Summary

भारताच्या संविधानाने नागरिकांना असा अधिकार दिला आहे ज्यात देशाचं नशिब बदलण्याची क्षमता असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज नमो अॅपवरून देशभरातील भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचं (Election Comission) कौतुकही केलं. मोदी कार्याकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) सुरु होणारा सोहळासुद्धा २३ जानेवारीपासून सुरु केला आहे. आज राष्ट्रीय मतदार दिवस (National Voter day) आहे आणि देशातील सर्व मतदारांचे अभिनंदन करतो. सर्व नागरिकांना आवाहन आहे की, मतदानात सहभाग घ्या, ७५ टक्के मतदान व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भारताच्या संविधानाने नागरिकांना असा अधिकार दिला आहे ज्यात देशाचं नशिब बदलण्याची क्षमता आहे. प्रत्येक मताची इतकी ताकद आहे जी अनेक योजना सुरु करते, महत्त्वाचे निर्णय घ्यायला लावते. देशाच्या प्रत्येक मतदारासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या जनतेनं सरकार बनवलं असल्याचंही मोदी म्हणाले.

PM Narendra Modi
Voters Day : मतदान कार्ड बनवायचंय? एका क्लिकवर जाणून घ्या फंडा

भारताच्या निवडणूक आय़ोगाचं कौतुक करताना मोदी म्हणाले की, भारत त्या देशांपैकी एक आहे जिथं निवडणूक आयोग लोकांना नोटीस पाठवू शकतो. अधिकाऱ्यांची बदली करू शकतो. आपली निवडणूक प्रक्रियेनं इतर देशांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. आता तुम्ही कार्यकर्त्यांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन द्या असंही मोदी कार्यक्रमात म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com