
PM Modi
Sakal
नवी दिल्ली : ‘‘प्रत्येक क्षेत्रात वेगाने घौडदौड करीत असलेल्या भारतात प्रगती व नाविन्यतेच्या बाबतीत प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले आहे. त्यामुळे देशामध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’च्या उदघाटनप्रसंगी केले. आशियातील सर्वांत मोठा दूरसंचार, मीडिया व तंत्रज्ञानाचा कार्यक्रम म्हणून ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’ला ओळखले जाते. दूरसंचार खाते व सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम चार दिवस चालणार आहे.