esakal | 'टाइम'च्या प्रभावशाली लोकांच्या यादीत मोदी, ममता आणि पुनावाला
sakal

बोलून बातमी शोधा

'टाइम'च्या प्रभावशाली लोकांच्या यादीत मोदी, ममता आणि पुनावाला

'टाइम'च्या प्रभावशाली लोकांच्या यादीत मोदी, ममता आणि पुनावाला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : टाइम मॅगझीनने 100 सर्वांत प्रभावशाली लोकांची यादी जाहिर केली आहे. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे चेअरमन अदर पूनावाला यांचं नाव या यादीत समाविष्ट आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार : छगन भुजबळ

टाइम मॅगझीनने आज बुधवारी ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये सगळ्या प्रभावशाली लोकांना वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागण्यात आलंय. Icons, Pioneers, Titans, Artists, Leaders आणि Innovators असे हे प्रकार आहेत.

यामध्ये प्रभावशाली नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जींचं नाव आहे. त्यांच्याशिवाय या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इस्रायलचे राष्ट्रपती नेफ्टाली बेनेट, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नावे सामील आहेत. तर अदर पुनावाला यांचं नाव जगातील नेत्यांच्या वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: Dabholkar Murder: हमीद दाभोलकर म्हणतात; "आरोप निश्चिती ही केवळ..."

100 सर्वांत प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये दहशतवादी संघटना तालिबानचा राजकीय चेहरा मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचं देखील नाव सामील आहे. याशिवाय इनोवेटर्स प्रकारामध्ये एलॉन मस्क यांचं देखील नाव आहे. यामध्ये ब्रिटीश राजघराण्यातील प्रिंस हॅरी आणि त्यांची पत्नी मेगनचे देखील नाव सामील आहे.

loading image
go to top