PM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Lifestyle

PM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट?

PM Modi Fitness: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या दिवशी देशभऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. देशात आणि देशाबाहेर वर्षातून कितीतरी दौरे करणारे मोदी वयाच्या ७२ व्या वर्षीही फिट कसे आहेत याची तुम्हाला कल्पना आहे काय? जाणून घ्या त्यांची दिनचर्या आणि फिटनेस सिक्रेट. (pm modi fitness secret and daily routine)

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पदासंबंधित सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत दररोज त्यांच्या बिझी शेड्यूलमधला थोडा वेळ त्यांच्या आरोग्यासाठी काढतात. जगातील सगळ्यात व्यस्त लोकांमध्ये मोदींची गणणा होत असली तरी एवढ्या वयातही ते स्वत:ला फिट ठेवण्यात यशस्वी आहेत. पीएम मोदी दररोज व्यायाम करणं कधीच विसरत नाहीत.

दिवसाची सुरूवात कशी करतात मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दिवसाची सुरूवात योगाने करत असतात. योगा हा केवळ शारिरीक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी महत्वाचा आहे. मोदी वेगवेगळे योगासन करत स्वत:ला फिट ठेवत असतात. योगासन, प्राणायम आणि सूर्य नमस्कार त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे. विशेष म्हणजे ते देशात असो किंवा विदेशात त्यांच्या दिवसाची सुरूवात ते योगासन करूनच करतात.

हेही वाचा: PM Modi Birthday: दिल्लीत '५६ इंच' थाळी; साडे आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

मनशांतीसाठी करतात ध्यान

पंतप्रधान नरेंद्र मोदी योगासनासोबतच ध्यानही करतात. ध्यान त्यांना त्यांचं मन आणि डोकं शांत ठेवण्यास मदत करते. तसेच त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून त्यांना जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा ते लांब श्वास घेण्याचा व्यायामही करत असतात. तसेच सकारात्मक उर्जेसाठी ते आध्यात्मिक पुस्तकंही वाचत असतात.

हेही वाचा: Narendra Modi : पंतप्रधान म्हणाले, कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही; कारण...

काय आहे मोदींचं डाएट प्लान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डाएटबाबत कायम चर्चा चालली असते. त्यांच्या खाण्यापिण्याकडे ते विशेष लक्ष देत असतात. त्यांच्या जेवणात कायम शाकाहारी पदार्थ असतात. तसेच मोदी मसालेयुक्त पदार्थ खाणे टाळतात. गुजराती जेवण आणि खिचडी त्यांना फार आवडते. सोबतच त्यांच्या रोजच्या जेवणात दही असते.

हेही वाचा: PM Narendra Modi: "...तर नोटांवरही गांधीजींच्या ऐवजी नरेंद्र मोदींचा फोटो छापला जाईल"

दिवसभऱ्यात फक्त साडे तीन तासाची झोप

पीएम मोदी यांनी अक्षय कुमारला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की ते साडे तीन तासांच्या वर कधी झोपत नाहीत. तसेच त्यांना आता एवढे कमी तास झोपण्याची सवय झाली आहे असेही ते म्हणाले. ते रोज पहाटे पाच वाजता उठतात. त्यानंतर ३०-३५ मिनीट ते योगा करतात. त्यानंतर ते काही वेळ ध्यान करतात. सकाळचा नाश्ता ते ९ वाजताच्या आत आटोपतात. असंही ते मुलाखतीत म्हणाले होते.

Web Title: Pm Modi Birthday Know Lifestyle And Fitness Of Pm Modi Daily Routine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..