
नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाला या कारवाईची माहिती दिली. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रशंसाही पंतप्रधानांनी केली. दरम्यान, तिन्ही सैन्यदलांच्या सर्वोच्च प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटून पंतप्रधानांनी या कारवाईचे तपशील सादर केले. उद्या (ता. ८) सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून त्यावेळी त्यांना सविस्तर माहिती देण्यात येईल.