PM Modi Brother Accident : PM मोदींच्या भावाच्या गाडीला म्हैसूरमध्ये अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

PM Modi Brother Accident : PM मोदींच्या भावाच्या गाडीला म्हैसूरमध्ये भीषण अपघात

PM Modi Brother Prallhad Modi Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत फायनान्सिअल एक्सप्रेसने वृत्त प्रकाशित केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्यासोबत कारमध्ये मुलगा आणि सून प्रवास करत होते. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून, उपचारांसाठी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

म्हैसूर जवळील कडकोल्ला परिसरात हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

प्रल्हाद मोदी हे गुजरात फेअर प्राइस शॉप्स अँड केरोसीन लायसन्स होल्डर असोसिएशनचे प्रमुख आहेत. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एका सामाजिक कार्यक्रमात गुजरातच्या जनतेने भाजपला निवडून दिले आहे. 2024 मध्येही येथील सत्ता भारतीय जनता पक्षाकडेच राहील असा विश्वास मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींनी व्यक्त केला होता.