अमरनाथ यात्रेआधी पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे यावेळी पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं आहे. अमरनाथ यात्रेचा बेसकँप पहलगाममध्ये असतो. त्यामुळे अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटकांवर हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. या प्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत. तसंच गृहमंत्री अमित शहांना घटनास्थळी जाण्यास सांगितल्याची माहिती समजते.