

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे नितीन नवीन यांनी आज हाती घेतली. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात नितीन नवीन यांच्या अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन नवीन यांना शुभेच्छा देत अभिनंदन केलं. यावेळी जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले.