
Prime Minister Narendra Modi congratulates US President Donald Trump on the successful Israel-Hamas peace deal, during talks highlighting India-US trade cooperation.
PM Modi congratulates Donald Trump on the Israel-Hamas peace agreement: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज(गुरुवार) फोनवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी एक्सवर याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन केले. तसेच दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापार चर्चेत झालेल्या प्रगतीचाही आढावा घेतला. दोघांमध्येही आगामी आठवड्यात एकमेकशांशी जवळून संपर्कात राहण्यावर सहमती झाली.
पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट ट्रम्प यांनी २० कलमी गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल आणि हमास यांच्यातील कराराच्या घोषणेचे स्वागत केल्यानंतर, काही तासांतच आली आहे.
इस्रायलने घोषणा केली आहे की कॅबिनेट बैठकीनंतर २४ तासांच्या आत गाझामध्ये युद्धबंदी लागू होईल. हा करार ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याचा भाग आहे, ज्यावर बुधवारी सकाळी इजिप्तमध्ये स्वाक्षरी करण्यात आली.
यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यपूर्वेतील शांतता प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे दिसत आहे. तर ट्रम्प यांनी गाझा योजनेच्या पहिल्या टप्प्यावर हमाससोबत झालेल्या कराराचे वर्णन इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे प्रतिबिंब म्हणून केले आहे .
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर घोषणा केली की इस्रायल आणि हमास यांनी गाझामधील लढाई थांबवण्यासाठी आणि ओलिस आणि कैद्यांना सोडण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीतील शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शविली आहे, ज्यामुळे पॅलेस्टिनी भूभागावरील युद्ध संपुष्टात येईल.
इस्रायल-हमास करारानुसार, हमास सर्व ४८ ओलिसांना सोडेल, ज्यात २० जिवंत आणि उर्वरित मृतदेह असतील. त्या बदल्यात, इस्रायल देखील पॅलेस्टिनी नागरिक आणि पॅलेस्टिनींचे मृतदेह परत करणार आहे.