हॅट्रिक झाल्यास कुठे होणार PM Modi यांचा शपथविधी? राष्ट्रपती भवनात शपथ घ्यायला भाजपचा नकार

PM Modi Oth Taking: दरम्यान सत्ताधारी भाजप एकीकडे 400 पारचा नारा देत आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जे जिंकतील असा विश्वास आहे. त्यामुळे 4 जूनला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
PM Modi Oth Taking Tentative Place
PM Modi Oth Taking Tentative PlaceEsakal

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा आज संपणार आहे. असे असताना भाजप आणि एनडीएतील पक्षांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. निकाल जाहीर होण्याआधीच भाजप आणि एनडीएने शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणीचे नियोजन सुरू केले आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार यावेळी राष्ट्रपती भवनात शपथ घेण्यास तयार नाही. राष्ट्रपती भवनात शपथ घेण्याची प्रथा मोडून काढण्यासाठी ते पर्यायी जागेचा विचार करत आहेत. याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.

सूत्रांनी सांगितले की, भाजपने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यास दिल्लीतील वेगळ्या ठिकाणी शपथविधी सोहळा आयोजित केला जाऊ शकतो. शपथविधीची संभाव्य तारीख 9 जून आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांनी नवीन सरकार शपथ घेण्याची शक्यता आहे.

प्रचारासोबतच शपथविधी सोहळ्याची तारीख आणि ठिकाण याबाबत भाजप गेल्या महिनाभरापासून नियोजन करत आहे. तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास मोठ्या सोहळ्याने शपथ घेण्याचा भाजपचा विचार आहे. यासाठी राष्ट्रपती भवनाऐवजी मोकळ्या जागा असलेल्या जागेचा विचार करत आहे, जेणेकरून अधिकाधिक पाहुण्यांना येता येईल.

PM Modi Oth Taking Tentative Place
Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तुरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

दरम्यान यंदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी, सत्ताधारी पक्षांची पहिली पसंती कर्तव्य पथ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग म्हणून कर्तव्य पथ बांधण्यात आला होता.

यापूर्वी 26 मे 2014 रोजी भाजपशासित एनडीए सरकारने शपथ घेतली होती. त्या वर्षी मतदानाचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाला होता.

मोदी यांनी पंतप्रधान म्हणून ३० मे २०१९ रोजी दुसऱ्यांदा शपथ घेतली होती. त्यावर्षी २३ मे रोजी निकाल जाहीर झाला होता. दोन्ही शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनात पार पडले होते.

PM Modi Oth Taking Tentative Place
Lok Sabha Election 2024: प्रशांत किशोर यांच्या 5 भविष्यवाणी; लोकसभा निकालाच्या किती जवळ जातील?

दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली. यातील सातव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. 543 जागा असलेल्या लोकसभेचा निकाल आता 4 जूनला जाहीर होणार आहेत.

दरम्यान सत्ताधारी भाजप एकीकडे 400 पारचा नारा देत आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जे जिंकतील असा विश्वास आहे. त्यामुळे 4 जूनला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com