
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि अमेरिकेच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. फ्रान्समध्ये ते एआय एक्शन समिटमध्ये सहभागी होणार आहेत. या समिटचे पंतप्रधान मोदी हे सहअध्यक्ष असतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय थर्मोन्युक्लिअर प्रायोगिक रिएक्टर परियोजनेचा दौरा करण्यासाठी ते मार्सिलेला जाणार आहेत. फ्रान्सनंतर ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जातील.