PM Modi Safari News : सफारीमध्ये वाघ दिसलाच नाही म्हणून पंतप्रधान रूसले; ड्रायव्हरवर ठपका, पण…

PM Modi did not spot a tiger in safari blame driver  security team at Bandipur Tiger Reserve
PM Modi did not spot a tiger in safari blame driver security team at Bandipur Tiger Reserve

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी (रविवार) बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात (BTR) २२ किमीच्या सफारीवर गेले होते. मात्र या सफारीदरम्यान त्यांना एकही वाघ त्यांना दिसला नाही. आता यासाठी पीएम मोदी ज्या वाहनातून प्रवास करत होते त्या वाहनाचा 29 वर्षीय चालक मधुसूदन याला दोष देण्यात येत आहे.

तसेच भाजपच्या काही नेत्यांनी आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाघ दिसेल असा मार्ग न निवडल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. इतकेच नाही तर पंतप्रधानांनी ज्या वाहनातून प्रवास केला त्या वाहनाची नोंदणी रद्द झाल्याबद्दल ट्विटही करण्यात आले होते.

नेमकं कारण काय?

मात्र, पंतप्रधान मोदींना वाघ न दिसण्याचे कारण हे त्यांचे सुरक्षा कर्मचारी, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी), स्थानिक पोलीस, नक्षलविरोधी दल यांचा असल्याचे समोर येत आहे. हे सर्वजण एकाच मार्गावर अनेक वेळा सफारीवर गेल्यानेच पंतप्रधान मोदींना वाघ पाहाता आला नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आधी पाच दिवस या सर्व टीम या मार्गावरून सफारीवर गेल्या होत्या.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

बीटीआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव त्या मार्गावर फेऱ्या मारत होत्या त्या टीमना पंतप्रधानांच्या सफारीच्या आधी पाचही दिवस वाघ दिसले. या सुरक्षा पथकांच्या सदस्यांनी वाघांचे फोटोही काढले. पण पंतप्रधानांना मात्र फक्त वाघाच्या पावलांचे काही ताजे ठसेच पाहाता आले, वाघ दिसलाच नाही.

वन अधिका-याने सांगितले की, त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची वाघांना सवय झालीय. फक्त यावेळी (रविवार) पंतप्रधान सफारी करत असताना ते अधिक सुरक्षित आणि शांत भागात गेले होते.

PM Modi did not spot a tiger in safari blame driver  security team at Bandipur Tiger Reserve
Ajit Pawar News : 'अजित पवार भाजप बरोबर जाणार….'; 'त्या' ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

अधिकाऱ्यांने पुढे सांगितले की, पंतप्रधानांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचे सफारी वाहन ताफ्याच्या मध्यभागी हवे होते. आम्हाला त्यांच्याकडे विनवणी करावी लागली की पंतप्रधान मोदींनी लीड व्हेइकलमधून जंगल व्यवस्थित पाहाता येईल. हे तपासण्यासाठी सुरक्षा पथकांनी जास्तीच्या सफारी फेऱ्या केल्या.

तसेच त्यांनी वाघ आणि बिबट्या पाहिल्यानंतर आणि त्यांचे फोटो काढल्यानंतर त्यांना खात्री पटली की मोदी पुढील वाहनात असावेत, तसेच बीटीआर कर्मचार्‍यांनी सुरक्षा पथकांना विनंती केली होती की शनिवारी रात्री हा मार्ग शांत राहू द्या जेणेकरून प्राण्यांच्या हालचालींना अडथळा येऊ नये.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना जाणीव झाल्याने शनिवारी रात्री शेवटची ड्रीलझाली नाही. त्यामुळेच मोदींना सुमारे ४० हत्तींचा कळप, २०-३० गौर, सुमारे ३० सांबर हरिण आणि इतर वन्यप्राणी तरी पाहायला मिळाले… पण सफारीचं मुख्य आकर्षण वाघ तेवढा सुटला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

PM Modi did not spot a tiger in safari blame driver  security team at Bandipur Tiger Reserve
Aaditya Thackeray : राजकारणात खळबळ करण्याची क्षमता असणाऱ्या दोन युवराजांची भेट, भावी युतीची नांदी?

पंतप्रधान मोदींनी केली तक्रार..

सफारीनंतर, पंतप्रधानांनी बीटीआर अधिकार्‍यांकडे त्यांना एकही वाघ न पाहायला मिळाल्याबद्दल तक्रार केल्याचं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच वाघ का दिसले नाहीत याची माहिती दिल्यावर, पंतप्रधानांनी त्यांचे सुरक्षा कर्मचाऱ्यांना सुनावलं की त्यांच्यामुळे त्यांना वाघ पाहाता आला नाही.

गाडीचे रजिस्ट्रेशन

तसेच बीटीआरचे संचालक रमेश कुमार यांनी 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले की, वाहनाची नोंदणी रद्द केल्याचा दावा चुकीचा आहे. फिरत असलेला वाहन क्रमांक जुना आहे. वाहन आता वापरात नाही. मधुसूदनचा दोष नाही. हाय सेक्युरिटीच्या नावाखाली निवडलेल्या मार्गावरून वाहने वारंवार जात असल्याने वाघ पाहाण्यात अडथळा निर्माण झाला.

तो ड्रायव्हर काय म्हणाला?

सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींचा ड्रायव्हर असलेल्या मधुसूदन यांनी सांगितले की, जंगलात वाघ पाहायला मिळणे हा नशीबाचा भाग आहे. मी शुक्रवारी आणि शनिवारी सुरक्षा पथकांसाठी ट्रायल रन केली तेव्हा दोन वाघ दिसले. खरं तर, पंतप्रधानांना वाघाचे ताजे ठसे दिसले, परंतु फक्त वाघ चुकला. माझ्या वरिष्ठांनी सांगितलेल्या मी मार्गाने गाडी चालवली. मी इतका घाबरलो होतो की मी पंतप्रधानांशी बोलू शकलो नाही. माझे सर्व लक्ष हे त्यांच्या सुरक्षिततेवर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com