
PM Modi
Sakal
पणजी/नवी दिल्ली : ‘‘जेव्हा शत्रू समोर असतो आणि युद्ध जवळ येते तेव्हा स्वबळावर लढण्याची ताकद असलेल्या पक्षाला नेहमीच फायदा होतो. सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक असून भारताची त्यादिशेने ठाम वाटचाल सुरू आहे, ’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेवर दिवाळी साजरी करताना पंतप्रधान मोदी यांनी नौसैनिकांना मार्गदर्शन केले. भारत आता नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले.