PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

PM Modi property; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
pm modi
pm modi

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. शपथपत्रावरील माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांची जंगम मालमत्ता ३.०२ कोटी रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे ५२ हजार ९२० रुपये रोख आहेत. त्यांच्या नावे जमीन, घर किंवा कार काहीही नाही.

पंतप्रधान मोदी यांच्या शपथपत्रातून असंही समोर आलंय की, पंतप्रधान मोदी यांचे करपात्र उत्पन्न दुप्पट झाले आहे. २०१८-१९ मध्ये त्यांचे करपात्र उत्पन्न ११ लाख होते, ते २०२२-२३ मध्ये २३.५ लाख रुपये झाले आहे. पंतप्रधान मोदी यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दोन खाते आहेत. त्यातील गांधीनगर शाखेच्या खात्यात ७३,३०४ रुपये आहेत, तर वाराणसी शाखेच्या बँक खात्यात सात हजार रुपये आहेत.

pm modi
Sushma Andhare : मोदींना कशासाठी पंतप्रधान करायचे? सुषमा अंधारे यांचा देवळालीतील सभेत सवाल

पंतप्रधान मोदी यांची २,८५,६०,३३८ रुपयांची एसबीआयच्या बँक खात्यात फिक्स डिपॉझिट आहे. त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत २, ६७,७५० रुपये आहे. पंतप्रधान मोदी २०१४ मध्ये पहिल्यांदा वाराणसीमधून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा ते वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. १ जून रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे.

pm modi
PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

पंतप्रधान मोदी आज वाराणसी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इत्यादी नेते उपस्थित होते. याशिवाय त्यांच्यासोबत पंडित गणेश्वर शास्त्री, लालचंद कुशवा, बैजनाथ पटेल आणि संजय सोनकर हे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शपथपत्रात मोबाईल क्रमांक आणि ई-मेलआयडी देखील उघड केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com