PM Modi
PM Modi Sakal

Video : PM मोदींचा स्वॅगच निराळा; प्रगती मैदानात बसून युरोपमध्ये चालवली कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 5G लॉन्च केले. यावेळी त्यांनी या सेवेचा अनुभवही घेतला.

PM Modi Drive Car In Europe From Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 5G लॉन्च केले. यावेळी त्यांनी या सेवेचा अनुभवही घेतला. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर बसून पंतप्रधान मोदींनी 5G तंत्रज्ञानाच्या मदतीने युरोपमध्ये कार चालवली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो ट्विट करत 'भारत जग चालवत आहे' असे लिहिले आहे.

यावेळी मोदींनी नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील जिओ पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केलेली ट्रू 5G उपकरणांबद्दल जाणून घेतले. तसेच 'जिओ-ग्लास'चा अनुभवही घेतला. यावेळी मोदींनी जिओच्या अभियंत्यांकडून एंड-टू-एंड 5G तंत्रज्ञानाचा स्वदेशी विकासाबद्दल माहिती करून घेतली. यावेळी पंतप्रधानांसह दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव, दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी हेही उपस्थित होते.

2G ते 5G चा असा होता प्रवास

भारतात इंटरनेट क्रांतीची सुरुवात 1995 मध्ये 2G सेवा सुरू झाल्यापासून झाली. देशाला 2G ते 3G पर्यंतचा प्रवास करण्यासाठी 14 वर्षे लागली. 3G सेवा 2009 मध्ये सुरू झाली. यानंतर 2012 मध्ये 4G सेवा सुरू झाली आणि आता 2022 मध्ये 5G सेवा लाँच करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये 5G सेवा आधीच सुरू आहे. भारताला 2G वरून 5G आणि 4G वरून 5G वर जाण्यासाठी तब्बल 27 वर्षे लागली. या सर्वामध्ये भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची वेगाने वाढणारी संख्या पाहता इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आज लाँच झालेल्या 5G कडे बघितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com