दुर्गापूर (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दुर्गापूर येथे झालेल्या एका रॅलीदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी राज्यातील महिलांवरील अत्याचार, दंगली, आणि पोलिसांच्या पक्षपाती कारवायांचा मुद्दा उपस्थित करत ममता सरकारवर (Mamata Government) अराजकता पसरवण्याचा आरोप केला.