पंतप्रधान मोदी राबवतात पाकिस्तानचा अजेंडा : केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 14 एप्रिल 2019

-  पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तानला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

दक्षिण गोवा येथे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतामध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला होता. यांसारख्या घटना निवडणुकांपूर्वी घडवल्या गेल्या. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या दोघांमध्ये नेमकं शिजतंय काय? हे समजत नाही.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर 14 फेब्रुवारीला हल्ला केला होता. या हल्ल्याबाबतही केजरीवाल यांनी सवाल उपस्थित केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi Follows Agenda of Pakistan says Arvind Kejriwal