PM मोदींच्या अन्न सुरक्षा योजनेमुळे गरिबीत होणारी वाढ टळली : IMF | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IMF on PMKGAY

PM मोदींच्या अन्न सुरक्षा योजनेमुळे गरिबीत होणारी वाढ टळली : IMF

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMKGAY) सुरू केली होती. ही योजना कोरोना महामारीच्या काळात भारतातील गरीबीच्या पातळीत होणारी वाढ रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरली, असं आंतराराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे.

हेही वाचा: IMF नं भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांना दिली मोठी जबाबदारी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अहवाल जारी करण्यात आला असून त्यामध्ये भारतातील गरीब २०१९ मध्ये एक टक्क्यापेक्षा कमी होती. आता २०२० मध्ये कोरोनाच्या काळात देखील गरीबाचा दर स्थिर होता. त्यात कुठलीही वाढ झालेली नाही. सलग दोन वर्ष गरीबीची पातळी कमी आहे. त्यात महामारीच्या काळात देखील या पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे हे गरीबीचं उच्चाटन मानले जाऊ शकते, असं अहवालात म्हटल्याचं वृत्त आंतराराष्ट्रीय नाणे निधीच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं दिलं आहे.

या योजनेंतर्गत गरीब आणि गरजूंना मोफत अन्नधान्य दिले जाते. करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत होते. या योजनेतल्या जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आला होता. एक महिन्यापूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. महामारीमुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नावर परिणाम झाला आहे. २०१४ ते १९ च्या तुलनेत २००४ ते २०११ मध्ये गरीबीचा दर जास्त होता, असंही या अहवालात म्हटल्याचं वृत्त आहे.

Web Title: Pm Modi Food Security Scheme Averted Rise In Poverty Says Imf Study

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modi
go to top