
IMF नं भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांना दिली मोठी जबाबदारी
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (IMF) भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. आयएमएफच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक जियोफ्रे ओकामोटो या येत्या २०२२ मध्ये राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी गीता गोपिनाथ यांची निवड करण्यात आली आहे. गोपीनाथ या २१ जानेवारीला आयएमएफच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
हेही वाचा: Twitter वरील फॉलोअर्स अचानक कमी झालेत? हे असू शकतं कारण
गीता गोपीनाथ कोण आहेत?
गीता यांचा जन्म म्हैसूरमध्ये झाला आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पुढील शिक्षण घेतलं. त्यानंतर वॉशिंगटन विद्यापीठामध्ये त्यांचं पुढील शिक्षण झालं. त्यानंतर २००१ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीचएडी केली. त्याचवर्षी शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यापूर्वी त्या हॉर्वर्ड विद्यापीठात जॉन झ्वान्स्त्र आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. हॉवर्डने त्यांना एक वर्ष रजा वाढवून ३ वर्ष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सेवा देण्याची संधी दिली होती. त्या लवकरच मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांच्यावर पुन्हा एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. येत्या २१ जानेवारीला त्या आय़एमएफच्या उपव्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू होणार आहेत.
निवडीबद्दल व्यक्त केला आनंद -
गीता गोपीनाथ यांनी त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कोरोना महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं गीता यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
Web Title: Chief Economist Gita Gopinath Is Proposed To Be First Deputy Managing Director Of International Monetary Fund
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..