अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबाद विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर रोड शो करत पंतप्रधान अहमदाबादमधील निकोल येथील खोडलधाम मैदानात पोहोचले. तेथे त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी सुमारे ५४०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. भाषणादरम्यान, त्यांनी अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांच्या टॅरिफवर निशाणा साधला.