esakal | PHOTO : पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले गुरुद्वारात

बोलून बातमी शोधा

PHOTO : पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले गुरुद्वारात

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी अचानक गुरुद्वारा श्री शीशगंज साहिब इथं गेले होते. गुरुद्वारात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रार्थना केली.

PHOTO : पंतप्रधान मोदी अचानक पोहोचले गुरुद्वारात
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी अचानक गुरुद्वारा श्री शीशगंज साहिब इथं गेले होते. गुरुद्वारात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रार्थना केली. त्यानंतर काही वेळ ते गुरुद्वारातच होते. मोदींनी अचानक गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत विशेष अशी सुरक्षा व्यवस्थाही नव्हती. तसंच ते कोणत्याही सुरक्षित मार्गाने पोहोचले नव्हते.

img

शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहाद्दुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या कार्याक्रमात मोदी पोहोचले. असंही सांगण्यात येत होतं की, श्री गुरु तेग बहाद्दुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी हे श्री गुरु तेग बहाद्दुर यांच्या स्मारकाचं लोकार्पण करतील. या स्मारकात गुरुंनी केलेल्या त्याग आणि बलिदानाची माहिती असेल. सेंट्रल वर्जवर 40 फूट उंची 45 फूट रूंदी इतका या स्मारकाचा आकार आहे.

img

हेही वाचा: स्फोट! दिवसभरात आढळले 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण

शीशगंज गुरुद्वारा जिथं उभारलं आहे तिथं औरंगजेबाच्या आदेशावरून एका जल्लादाने श्री गुरु तेग बहाद्दुर यांच्यासह शिष्यांचा गळा कापण्यात आला होता. औरंगजेबाने धर्म परिवर्तनासाठी अनेक प्रकारची प्रलोभने दाखवली. मात्र तरीही गुरुंसह शिष्य तयार झाले नाही तेव्हा गुरु तेग बहाद्दुर यांच्यासमोर शिष्यांची हत्या केली गेली. त्यानंतरही गुरु तेग बहाद्दुर यांनी शरणागती पत्करली नाही. त्यामुळे ऐतिहासिक गुरुद्वारा जगभरातील लोकांचं श्रद्धास्थान आहे.