
"PM Narendra Modi acknowledges RSS volunteers for their role in disaster relief and community service."
Sakal
नवी दिल्ली: ‘निस्वार्थ सेवेची भावना आणि शिस्त हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा.स्व. संघ) खरी ताकद आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना केले. संघाच्या स्थापनेला दसऱ्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधत केंद्र सरकारकडून लवकरच संघावर विशेष टपाल तिकीट आणि नाणे जारी केले जाण्याची शक्यता आहे.