आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्स विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन करणार PM मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

बंगळूरु विद्यापीठातील ज्ञानभारती परिसरात या नव्या कॅंपसचे उद्घाटन होणार आहे.

आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्स विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन करणार PM मोदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बंगळूरु - बंगळूरु येथील डॉ. बी. आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या नव्या कॅंपसचे उद्घाटन ६ डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परिसराचे उद्घाटन होणार असल्याची माहिती कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.

हेही वाचा: त्रिपुरात तातडीने CAPF च्या तुकड्या पाठवा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

बंगळूरु विद्यापीठातील ज्ञानभारती परिसरात या नव्या कॅंपसचे उद्घाटन होणार आहे. यासंबंधीत माहिती देण्यासाठी कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीला मंत्री सोमन्ना, सी. एन. अश्वथ नारायण, मुनिरत्न आणि विद्यापीठाचे कुलुगुरु डॉ. भानुमूर्ती हे उपस्थित होते. यावेळी उद्घाटना विषयी चर्चा करण्यात आली.

loading image
go to top