
भारताने आज 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 12 व्या वर्षी तिरंगा फडकवला आणि देशाला संबोधित केले. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ‘नवभारत’ ठेवण्यात आली आहे, जी भारताच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेचे प्रतीक आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय एकता, ऑपरेशन सिंदूर, आर्थिक विकास आणि कल्याणकारी योजनांचा विस्तार यावर भर दिला. त्यांनी पाकिस्तानला अण्वस्त्रांच्या धमक्यांबाबत कठोर इशारा देत, “भारत आता ब्लॅकमेल सहन करणार नाही,” असे ठणकावले.