MUDRA Scheme : मुद्रा योजनेमुळे असंख्य लोकांना उद्योजकाची संधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाभार्थींशी संवाद
PM Narendra Modi : मुद्रा योजनेमुळे असंख्य लोकांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेच्या दहा वर्धापन दिनानिमित्त बोलताना सांगितले. भविष्यात या योजनेत सुधारणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : मुद्रा योजनेमुळे असंख्य लोकांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य दाखविण्याची संधी मिळत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.