
NDA Meeting
Sakal
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक मंगळवारी (ता. ९) होणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांसाठी दोन दिवसांच्या कार्यशाळेला आज सुरुवात झाली. संसद भवन परिसरात झालेल्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांसमवेत शेवटच्या रांगेत बसून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जीएसटी सुधारणांसाठी पंतप्रधान मोदींचे कार्यशाळेत अभिनंदन करण्यात आले.