
नवी दिल्ली : डीप स्पेस मायक्रोचिपच्या निर्मिती क्षेत्रामध्ये भारताने आज महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३२- बिट मायक्रोप्रोसेसर- विक्रमचे आज ‘सेमीकॉन इंडिया-२०२५’ या परिषदेमध्ये अनावरण करण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) पुढाकाराने आणि त्याच संस्थेच्या वापरासाठी या चिपची निर्मिती करण्यात आली आहे. देशातील सेमीकंडक्टर उद्योगाला या चिपमुळे मोठे बळ मिळणार असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.