मणिपूर: मणिपूरमधील हिंसाचारानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शनिवारी ते मिझोराममधून प्रथम चुराचांदपूरला आणि त्यानंतर इम्फाळला पोहोचतील. ते चुराचांदपूर येथे ७,३०० कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी ते करतील, तर १,२०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करतील.