Mann Ki Baat Today : चार हजार मुस्लिम महिलांनी 'मेहरम'शिवाय पूर्ण केली हज यात्रा; PM मोदी म्हणाले हा मोठा बदल!

PM Modi on Hajj : हज यात्रेच्या बदललेल्या नियमांचं स्वागत होत आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
PM Modi Mann Ki Baat
PM Modi Mann Ki BaateSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी हजच्या बदललेल्या नियमांचा मुस्लिम महिलांना कसा फायदा झाला याबाबत माहिती दिली. यासोबतच, या महिला प्रेरणादायी असल्याचंही ते म्हणाले आहेत.

"मला अशा कित्येक मुस्लिम महिलांची पत्रं आली, ज्या नुकत्याच हज यात्रेवरुन परत आल्या आहेत. या महिलांनी कोणत्याही पुरूष नातेवाईकाशिवाय एकट्याने हज यात्रा पूर्ण केली. अशा तब्बल 4000 महिला आहेत. हा मोठा बदल आहे." असं पंतप्रधान म्हणाले.

PM Modi Mann Ki Baat
Haj Yatra : भारतातून हज यात्रेकरूंचा कोटा कसा ठरतो, खर्च किती येतो? जाणून घ्या सविस्तर

'मेहरम' म्हणजे कोण?

मेहरम म्हणजे एखाद्या महिलेच्या कुटुंबातील रक्ताचा पुरुष नातेवाईक. यामध्ये वडील, भाऊ, मुलगा यांचा समावेश होतो. यापूर्वी मेहरम किंवा आपल्या पतीसोबतच मुस्लिम महिला हज यात्रेला जाऊ शकत होत्या.

मात्र, हा नियम 2018 साली बदलण्यात आला होता. "यावर्षी सौदी अरेबिया सरकारने एकटं हजला आलेल्या महिलांसाठी महिला समन्वयक तैनात केले होते. यासाठी मी सौदी अरेबिया सरकारचेही आभार मानतो", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi Mann Ki Baat
PM Modi : देशातील प्रत्येक भाषेला योग्य सन्मान आणि श्रेय देण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण धोरण करेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बदलाचं स्वागत

पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या काही वर्षांमध्ये हज यात्रेच्या नियमांमध्ये जे बदल करण्यात आले आहेत, त्यांचं स्वागत आणि कौतुक होतं आहे. कित्येक मुस्लिम माता-भगिणींनी याबाबत मला पत्रं लिहिली आहेत. आता जास्तीत जास्त लोकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळत आहे. या यात्रेला जाऊन आलेल्यांनी मला पत्राच्या माध्यमातून आशीर्वाद दिला आहे. या महिला खरंच प्रेरणादायी आहेत."

हजला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढली

एकट्याने हज यात्रेला जाणाच्या परवानगी मिळाल्यानंतर, या यात्रेला जाणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षी एकटं हजला जाण्यासाठी 4,314 महिलांनी अर्ज केले होते. स्वातंत्र्यानंतर 2018 साली पहिल्यांदाच भारताने हजसाठी 'मेहरम'ची अट मागे घेतली होती.

PM Modi Mann Ki Baat
Tariq Mansoor : मोदींच्या टीममध्ये आला मुस्लिम चेहरा! कोण आहेत तारीक मन्सुर ? भाजपच्या उपाध्यक्षपदी झाली निवड

अल्पसंख्याक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला चार किंवा त्याहून अधिक महिलांच्या ग्रुपसोबत हज यात्रा करू शकतात. यासाठी त्यांना सोबत पती किंवा पुरूष नातेवाई असण्याची आवश्यकता नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com