esakal | Mann Ki Baat: व्होकल फॉर लोकल, सैनिकांसाठी दिवा...जाणून घ्या काय म्हणाले PM मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

modi main.jpg

यावेळी बाजारात जाताना 'व्होकल फॉर लोकल'वर लक्ष दिले पाहिजे. आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे

Mann Ki Baat: व्होकल फॉर लोकल, सैनिकांसाठी दिवा...जाणून घ्या काय म्हणाले PM मोदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना यंदाच्या दिवाळीला भारतीय जवानांसाठी घरात एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. रविवारी 'मन की बात'मध्ये ते बोलत होते. देशवासीय मर्यादा आणि संयमासह सण साजरा करत आहेत. त्यामुळे विजय निश्चित आहे, असे सांगत दसरा हा संकटांवर संयमाने विजय मिळवण्याचा सण असल्याचे म्हटले. 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी...


कोरोना विषाणूविरोधात सुरु असलेल्या युद्धात आपला विजय निश्चित आहे. परंतु, या संकटाच्या काळात आपल्याला धैर्य कायम ठेवावे लागेल. पूर्वी दुर्गा पूजेसाठी मोठमोठे मंडप उभारले जायचे. दसऱ्याच्या दिवशी रामलीलाचे आयोजन करण्यासाठीही स्पर्धा असायची. नवरात्र काळात मंदिरांमध्येही मोठी गर्दी पडायची. परंतु, यावेळी सर्वांनी संयम दाखवला. येणाऱ्या काळात आणखी भरपूर सण आहेत. यामध्ये ईद, वाल्मिकी जयंती, शरद पौर्णिमा, दिवाळी, धनत्रयोदशी, गुरुनानक जयंतीचा यामध्ये समावेश आहे. पण आपल्याला मर्यादेत राहायचे आहे. 

जेव्हा सण-उत्सव येतात, तेव्हा आपल्या मनात सर्वांत आधी विचार येतो तो बाजारात जाण्याचा. यावेळी बाजारात जाताना 'व्होकल फॉर लोकल'वर लक्ष दिले पाहिजे. आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे. सण साजरा करताना आपल्याला लॉकडाऊनचेही स्मरण करायला हवे. ज्यांच्याशिवाय आपले आयुष्य कठीण होते, अशांची उणीव आपल्याला या काळाने जाणवून दिली आहे. पोलिस, सफाई कामगार, दूधवाले, पेपरवाले, घरातील कर्मचारी यांनाही आपल्या आनंदात सामील करुन घ्या.

हेही वाचा- शस्त्र पूजा करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला दिला इशारा