esakal | "सणासुदीत कोरोनाचा विसर पडू देऊ नका, संकट गेलेलं नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी

"सणासुदीत कोरोनाचा विसर पडू देऊ नका, संकट गेलेलं नाही"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशतील जनतेसोबत संवाद सांधला. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं अवाहन केलं. कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात नियमाचं पालन करा. सण-उत्सव साजरे करताना कोरोना आणखी गेला नाही हे लक्षात ठेवा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या 79 व्या भागात विविध विषयांवर भाष्य केलं. यामध्ये कोरोना नियम, टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा(Tokyo Olympic), कारगिल युद्ध दिवस, अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्य दिन या सर्व मुद्द्यावर देशातील जनतेसोबत संवाद साधला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं आवाहनही मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केलं. पंतप्रधानांनी आपल्या 78 व्या भागातही ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूचं कौतुक केलं होतं. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी सतत जनतेशी संवाद साधत आहेत. आजही देशवासियांना त्यांनी संबोधित केलं.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन प्रसारित होत असतो. 'मन की बात' या २० मिनिटांच्या कार्यक्रमातून सरकारच्या महत्वाच्या कामांची माहिती दिली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातील दखलपात्र छोट्या-मोठ्या घटनांचा आढावा यात घेतला जातो. जनतेकडून विषय विचारले जातात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात. 'मन की बात'च्या पहिल्या एपिसोडमध्ये (ऑक्टोबर २०१४) मोदींनी स्वच्छतेवर भाष्य केलं होतं. तर नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यघटनेवर चर्चा केली होती. आजपर्यंत या कार्यक्रमासाठी ६१,००० कल्पना जनतेनं दिल्या आहेत. देशातील सर्व प्रकारची प्रसारमाध्यमं या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करत असतात.

loading image
go to top