
PM Modi Meets German singer Cassandra Viral video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तमिळनाडूतील पल्लाडम येथे जर्मन गायिका कॅसांड्रा मेई स्पिट्झमन (German singer Cassandra Mae Spittmann) आणि तिच्या आईची भेट घेतली. यादरम्यान कॅसांड्रा यांनी पीएम मोदींसमोर 'अच्युतम केशवम दामोदरम' आणि एक तमिळ गाणेही गायले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये कॅसांड्राचे गाणे ऐकून पंतप्रधान मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदींनी गाण्यावर ठेका धरल्याचेही पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे पंतप्रधानांनी सप्टेंबर 2023 मध्ये 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमात अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या कॅसांड्रा यांचा उल्लेख केला होता. कॅसांन्ड्रा विशेषतः भक्ती गीते गातात, ज्यांना सामान्यांकडून चांगली पसंती मिळताना पाहायला मिळते.
तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पीएम मोदी कॅसांड्रा यांचे भजन ऐकताना आणि सोबत टेबलावर वाजवताना पाहायला मिळत आहेत. कॅसांड्रा यांचे भजन संपल्यानंतर व्हिडिओमध्ये पीएम मोदी वाहवा आणि टाळ्या वाजवतानाही दिसतात. पंतप्रधानांनी या गायणाते कौतुक देखील केले.
खास गोष्ट म्हणजे कॅसांड्रा या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत, अलीकडेच त्यांनी 'जगत जान पालम' आणि 'शिव पंचाक्षर स्तोत्रम्' हे भजन गायले होते, ज्याचा उल्लेख करत PM मोदींनी त्यांची स्तुती केली होती. पीएम मोदी म्हणाले होते की, कॅसांड्रा यांचा आवाज खूप गोड आहे. त्यांचा प्रत्येक शब्द भावना दर्शवतो, ज्यामुळे त्यांची इश्वाराप्रती असलेली ओढ सहज जाणवते. तुम्हाला हा आवाज जर्मनीतील एका मुलीचा आहे हे ऐकून आश्चर्य वाटेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.