PM Narendra Modisakal
देश
PM Narendra Modi: ''एखादा कर्मचारी निलंबित होऊ शकतो तर पंतप्रधान का नाही?'', नव्या कायद्याबाबत मोदी स्पष्ट बोलले
If a small employee can be suspended, why not the Prime Minister?: "इतक्या वर्षांत आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही, तर स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या सरकारांच्या भ्रष्टाचाराची एक मोठी यादी आहे. आरजेडीचा भ्रष्टाचार तर बिहारमधील प्रत्येक लहान मुलाला माहीत आहे."
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहार दौऱ्यावर असताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पीएम-सीएम आणि मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली ३० दिवसांपर्यंत तुरुंगात राहिल्यास पदावरून हटवणाऱ्या नवीन कायद्यावर त्यांनी भाष्य केले. पीएम मोदी म्हणाले, "एनडीए सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध असा एक कायदा आणला आहे, ज्याच्या कक्षेत देशाचा पंतप्रधानही येतो. या कायद्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही समाविष्ट केले आहे."