Gujarat: स्टार प्रचारक ठरले! गुजरातमध्ये महाराष्ट्रातील 'हे' नेते गाजवणार निवडणुकीचं मैदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat elections 2022

Gujarat: स्टार प्रचारक ठरले! गुजरातमध्ये महाराष्ट्रातील 'हे' नेते गाजवणार निवडणुकीचं मैदान

Gujarat elections 2022: गुजरातमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांचे नाव आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील भाजपचे स्टार प्रचारक असतील. या यादीत 40 स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे.

गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि स्मृती इराणी यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्टार प्रचारक असतील.

हेही वाचा: Bharat Jodo : नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठं? १० हजार फेटेधारी भारत जोडोमध्ये दाखल

हेही वाचा: Jitendra Awhad: विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नावांचाही समावेश आहे. दोघांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. भोजपुरी गायक आणि पक्षाचे खासदार मनोज तिवारी, रवी किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांना स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे.

182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेच्या दोन टप्प्यातील निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाने असा दावा केला आहे की रुपाणी आणि पटेल यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीत लढण्यास नकार दिला आहे आणि यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाला पत्र लिहिले आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.