
PM Narendra Modi
sakal
धार : ‘‘आॅपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय जवानांनी पाकिस्तानला अगदी अल्पकाळातच गुडघे टेकण्यास भाग पाडले,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथ बुधवारी केले. येथे उभारण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरेल पार्क’चे (पीएम मित्रा) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.