सुटीवर असलेले राहुल गांधी थेट लोकसभेत

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

संसदेचे अधिवेशन नवी दिल्लीत सुरू झाले असताना राहुल गांधी कुठे आहेत? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. लोकसभेच्‍या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधीच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी अनुपस्थित दिसले. राहुल गांधी सध्या परदेशात सुटीवर असल्याची माहिती होती. पण, ते सुटीवर परतत थेट लोकसभेत पोहोचले.

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु झाले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पहिल्याच दिवशी गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अद्याप मागे घेतला नसल्याची माहिती मिळत असून सुटीवर परतलेले राहुल गांधी यांनी थेट लोकसभेत हजेरी लावत शपथ घेतली.

लोकसभेच्‍या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधीच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी यांनी संसदेत येण्यास उशीर केला. यावरून राहुल गांधी अनुपस्थित असल्याच्या चर्चाना वेग आला.

दरम्यान, राहुल गांधी यांना अमेठीतून पराभव स्वीकारावा लागला होता. स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला होता. आज संसदेत स्मृती इराणी या शपथविधीला आल्या असताना त्यांचे बाक वाजवून स्वागत करण्यात आले. राहुल गांधी हे वायनाड मधून निवडून आले आहेत.

अधिवेशनाचे पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाणार आहे. 19 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील. 26 जुलै रोजी लोकसभा अधिवेशनाची सांगता होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi, other MPs take oath on 1st day of 17th Lok Sabha Rahul Gandhi represent