esakal | PM मोदींनी इंदिरा गांधींना वाहिली श्रद्धांजली; राहुल गांधींची भावूक पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

indira gandhi death anniversary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. 

PM मोदींनी इंदिरा गांधींना वाहिली श्रद्धांजली; राहुल गांधींची भावूक पोस्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अशा शब्दांत त्यांनी ट्विट केलं आहे. 1984 मध्ये 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भावूक पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. 

राहुल गांधींनी ट्विटरवर एक श्लोक पोस्ट केला असून त्यात इंदिरा गांधींनी दाखवलेल्या मार्गासाठी धन्यवाद म्हटलं आहे. "असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय.' असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून जीवनाकडे, धन्यवाद आजी मला या शब्दांचा योग्य अर्थ समजावून सांगितलास आणि या शब्दांसोबत जगायला शिकवलेस असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. अशोक गेहलोत यांनी म्हटलं की,'भारताच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे. त्यांनी देशाच्या एकतेसाठी प्राणांची आहुती दिली.'

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

हे वाचा - पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली; सी प्लेनचं उद्घाटन करणार

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनीच हत्या केली होती. इंदिरा गांधींनी जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा पंतप्रधानपद सांभाळले. याशिवाय पंतप्रधान होण्याआधी 1959 ते 1960 या काळात त्या काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या.