शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दांपलिकडचे - PM मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दांपलिकडचे - PM मोदी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दांपलिकडचे - PM मोदी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी यासोबतच बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देत असलेला व्हिडिोसुद्धा शेअर केला आहे. पुरंदरे यांचे कार्य सदैव स्मरणात राहील आणि त्यांच्या कार्यातून ते जीवंत असतील असंही मोदींनी म्हटलं आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहताना मोदी म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांचे जाण्यानं झालेलं दु:ख शब्दात मांडणं कठीण आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.

भारताच्या इतिहासाचं प्रचंड असं ज्ञान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना होतं. त्यांच्याशी संवाद साधण्याचं भाग्य मला लाभलं. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानिमित्त संवाद साधला असं मोदींनी ट्विटरवर म्हटलं आहे. तसंच त्यांनी व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे : चालता-बोलता इतिहास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या कार्यातून आपल्यात जीवंत राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून या दु:खातून सावरण्याची ताकद त्यांना मिळो, ओम शांती अशा शब्दांत मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

loading image
go to top